जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

अहिल्यानगर, – जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी दादासाहेब गिते यांनी मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७(१)(३) अन्वये १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत (रात्री १२ वाजेपर्यंत) शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केला आहे.

सदर आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, मिरवणुका व प्रेतयात्रांमधील जमावास लागू होणार नाही. तसेच पोलीस अधिकारी, कामावर असलेले शासकीय अधिकारी-कर्मचारी आणि सभा किंवा मिरवणूक काढण्यासाठी रीतसर परवानगी घेतलेल्या व्यक्तींनाही हा आदेश लागू होणार नाही.

या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles