Saturday, February 21, 2026

नगर शहरातील जून्या इमारतीला भीषण आग: लाखो रुपयांचे नुकसान, व्हिडीओ…

अहिल्यानगर – शहरातील बुरूड गल्ली (बांबू गल्ली) येथील एका जून्या इमारतीला मंगळवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत इमारत पूर्णतः भस्मसात झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी हानी झालेली नाही. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली आहे.
बांबू गल्ली येथील आनंद चंगेडिया यांच्या मालकीच्या जून्या इमारतीला मंगळवारी सकाळी ७ वा.च्या सुमारास भीषण आग लागली. प्राथमिक अंदाजानुसार सदरची आग ही शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचे सांगितले जात आहे. संपूर्ण सागवान लाकडाच्या या इमारतीला आग लागल्यानंतर आगीने रौद्ररूप धारण केले. आगीचे आणि धूराचे लोळ बाहेर पडत होते. आग लागल्याचे समजताच महापालिका अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.

महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. सदर इमारत ही १९३७ चे बांधकाम आहे. संपूर्ण कांडा दांडाची इमारत आहे. तीला सकाळी सात वा. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. महापालिका अग्निशमन दलाने अटोकाट प्रयत्न करून आग विझवलेली आहे. आगी जीवितहानी हानी टळलेली आहे मात्र इमारत मालक चंगेडिया यांची मोठी आर्थिक हानी झाली असल्याचे आयुक्त डांगे यांनी सांगितले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles