अहिल्यानगर जिल्ह्यात …..आता २१ डिसेंबरला ‘ड्राय डे’

आता २१ डिसेंबरला ‘ड्राय डे’

अहिल्यानगर : राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलल्याने अहिल्यानगर जिल्ह्यात आता ३ डिसेंबरऐवजी २१ डिसेंबर २०२५ रोजी ‘ड्राय डे’ (Dry Day) असणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी याबाबतचे सुधारित आदेश जारी केले आहेत.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मतमोजणीची तारीख बदलली आहे. त्यामुळे आता २१ डिसेंबरला मतमोजणी संपेपर्यंत खालील ठिकाणी मद्यविक्री बंद राहील:
संगमनेर, कोपरगांव, शिर्डी, राहाता, श्रीरामपूर, देवळाली प्रवरा, राहुरी, शेवगाव, पाथर्डी, जामखेड, श्रीगोंदा (नगरपरिषदा) आणि नेवासा (नगरपंचायत).

या दिवशी सर्व देशी-विदेशी मद्यविक्री दुकाने व बीअर बार बंद राहतील. घाऊक विक्रेते (CL-2/FL-1) व उत्पादक कार्यरत राहू शकतील, परंतु त्यांना ‘ड्राय डे’ लागू असलेल्या क्षेत्रात मद्यपुरवठा करण्यास सक्त मनाई असणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles