राज्यातील नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा निकाल येत्या २१ डिसेंबर रोजीच जाहीर केला जाणार आहे. नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्चब केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची सुनावणी नुकतीच पार पडली. यावेळी याचिकाकर्त्याचे असे म्हणणं होतं की २ डिसेंबरला जे मतदान झालं होतं, त्याचा निकाल २१ डिसेंबर रोजी नाही तर त्याच्या आधी करण्यात यावी. पण यासाठी कोर्टाने नकार दिला आहे. कोर्टाने नागपूर खंडपीठाचा निर्णय कायम ठेवला आहे. यावेळी कोर्टाने २ डिसेंबरला झालेले मतदान आणि २० डिसेंबरला होणारे मतदान या दोन्हीचा निकाल एकत्र २१ डिसेंबरलाच होईल.
नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार असल्याचा निकाल नागपूर खंडपीठानं दिला होता. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला असून ही मागणी फेटाळली आहे. त्यामुळे आता २१ डिसेंबरलाच मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार असल्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.


