Tuesday, February 24, 2026

महापौरपदाचा पेच वाढला, एकनाथ शिंदेंनी घेतला टोकाचा निर्णय, भाजपला मोठा धक्का

मुंबई महानगरपालिकेच्या महापौर निवडीसाठी आता अवघे दोन दिवस उरले आहेत. त्यातच आता महायुतीमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महापौरपद आणि स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरून भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचा एकत्रित गटनोंदणीचा प्रस्ताव फेटाळला आहे. त्यांनी आपल्या २९ नगरसेवकांची स्वतंत्र गटनोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजपला मुंबईत आपला महापौर बसवायचा आहे, कारण त्यांच्याकडे नगरसेवकांचे संख्याबळ जास्त आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अडीच वर्षे आमचा महापौर असावा अशी मागणी केली आहे. या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांत एकमत होऊ शकलेले नाही. त्यातच आज दुपारी १२ वाजता शिवसेनेचे सर्व २९ नगरसेवक दादर येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करतील. त्यानंतर हे सर्व नगरसेवक बसने नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील कोकण भवन येथे जाऊन स्वतंत्र गटाची अधिकृत नोंदणी करतील. सध्या एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरे गावी आहेत. त्यामुळे राहुल शेवाळे आणि शीतल म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया पार पडणार आहे.काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवले होते. यामुळे भाजपचे दिल्लीतील वरिष्ठ नेते नाराज झाले आहेत. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना महापौरपदाबाबत कोणतीही तडजोड करू नका असे स्पष्ट आदेश दिले आहेत. दुसरीकडे, शिंदे गट पहिल्या अडीच वर्षांसाठी महापौरपदावर ठाम असल्याने पेच निर्माण झाला आहे. मुंबईत तणाव असतानाच एकनाथ शिंदे साताऱ्यातील आपल्या दरे गावी निघून गेले आहेत. भाजपच्या भूमिकेवर त्यांनी ही एक प्रकारची नाराजी व्यक्त केली आहे, असे म्हटले जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles