चित्रपटालाही लाजवेल असं केतन-सियाचं प्रीवेडिंग, व्हिडिओ आला समोर

गेल्या काही दिवसांपासून लोहगड हत्याकांडाची संपूर्ण देशात चर्चा आहे. याबाबत दररोज नवे खुलासे होत आहेत. केतन अग्रवाल या तरूणाची हत्या त्याची होणारी पत्नी सिया गोयलने तिचा प्रियकर चेतन चौधरी याच्या मदतीने केल्याचे समोर आले आहे. सियाला केतनशी लग्न करायचे नव्हते, त्यामुळे तिने 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावरील सुमारे 400 फूट खोल दरीत केतनला ढकलून त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. अशातच आता या दोघांच्या प्रीवेडिंगचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात केतन आणि सिया हे रोमँन्टिक गाण्यावर डान्स करत असल्याचे समोर आले आहे. केतन आणि सिया यांच्या प्री वेडिंगचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात केतन आणि सिया एकमेकांसोबत बॉलिवूडच्या रोमँन्टिक गाण्यावर डान्स करत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे. यात काही नातेवाईकही दिसत आहेत. तसेच नातेवाईकांकडून सियाचे त्यांच्या कुटुंबात स्वागत केले जात असल्यातेही पोस्टरमध्ये दिसत आहे. या व्हिडिओत केतन आणि सिया हे दोघेही खूप आनंदी दिसत आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पुण्यात गाजलेल्या केतन अग्रवाल खून प्रकरणात आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज धाडसी निर्णय घेतला. या प्रकरणात पोलिसांची बाजू न्यायालयात भक्कमपणे मांडण्यासाठी जेष्ठ वकीलाची नियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे येथील २६ वर्षीय व्यावसायिक केतन विशाल अग्रवाल यांचा मृत्यू हा अपघात नसून त्यांची मंगेतर (होणारी पत्नी) सिया गोयल हिने आपल्या प्रेमीच्या मदतीने केलेली हत्या असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. लोणावळ्याजवळील ऐतिहासिक लोहागड किल्ल्यावर १८ जून २०२६ रोजी ट्रेकिंग दरम्यान केतन यांना ४०० फूट खोल दरीमध्ये ढकलून देऊन मारण्यात आले होते मारण्यात आले होते.

लोणावळा ग्रामीण परिसरात झालेल्या केतन अग्रवाल यांच्या दुर्दैवी हत्येच्या प्रकरणात केतन अग्रवाल यांचे वडिल विशाल अग्रवाल यांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि आपल्या मुलाला न्याय मिळावा, अशी मागणी केली.

या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी कोणतीही कसूर ठेवली जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी त्यांना दिले.

या प्रकरणात जलदगती न्यायालय आणि विशेष सरकारी वकिल म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची त्यांची मागणी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ मान्य केली आणि तसे निर्देश विधी व न्याय विभागाच्या सचिवांना दिले. ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांनीही या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहण्यास संमती प्रदान केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles