सुपा एमआयडीसीमधील कंपनीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसी परिसरातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. येथील सीपीजी कंपनीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने कंपनीच्या आवारातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत तरुणाचे नाव तुषार राजेंद्र पाटील (वय २७, मूळ रा. पांढरत, ता. भडगाव, जि. जळगाव; सध्या रा. नूर हाईट्स, अंकुर हॉस्पिटलजवळ, सुपा, ता. पारनेर) असे आहे. तुषार हा सुपा एमआयडीसी मधील सीपीजी कंपनीच्या मेंटेनन्स डिपार्टमेंटमध्ये कार्यरत होता. २४ जून रोजी तो नेहमीप्रमाणे कर्तव्यावर असताना, दुपारच्या सुमारास त्याने मेंटेनन्स डिपार्टमेंट जवळील एक्झिट दरवाजापाशी असलेल्या जिन्याच्या जॉईंटला स्टेपिंग पट्टीने गळफास घेतल्याचे आढळून आले.

तेथे कार्यरत इतर सहकारी कर्मचाऱ्यांनी ही बाब तात्काळ कंपनी व्यवस्थापनास आणि सुपा पोलिसांना कळविली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पारनेर ग्रामीण रुग्णालयात पाठविला. याबाबत सुपा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत तुषार पाटील याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संपत खैरे पुढील तपास करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles