अजित दादांचा मिसळचा आस्वाद घेताना जुना व्हिडीओ व्हायरल, म्हणाले होते, ……

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे आज सकाळी विमान अपघातात निधन झाले. ते मुंबईहून बारामतीला जात होते आणि तिथे अनेक राजकीय कार्यक्रमांना आणि सभांना संबोधित करणार होते. मिळालेल्या माहितीनुसार, लँडिंग दरम्यान विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमान कोसळले आणि विमानाचा स्फोट झाला. हा स्फोट एवढा भयंकर होता की विमानात प्रवास करत असलेले सर्वजण यात मरण पावले.

अजित पवार हे त्यांच्या मिश्किल कमेंट्ससाठी, सेन्य ऑफ ह्युमरसाठी आणि त्यांच्या बिनधास्त नेतृत्वासाठी प्रसिद्ध होते. राजकारणापलिकडे सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अनेकदा दिसणारे त्यांची जेवणाबाबतची आवड, महाराष्ट्रीयन संस्कृती आणि ग्रामीण भागाशी जोडलेलं खोल नातं याची झलक वेळोवेळी दिसून आली होती.अजित पवार हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध पदार्थांपैकी एक असलेल्या मिसळ पावचा आस्वाद घेताना अनेकदा दिसले होते. मागच्या वर्षी एप्रिलमध्ये पुण्यात पार पडलेल्या महात्मा फुले जयंती सोहळ्यात अजित दादांनी मिसळ पावचा आनंद घेतला होता. यावेळी जवळपास १० हजार किलो मिसळ पाव लोकांना देण्यात आले होते. अजित दादांनी त्यावेळी उपस्थितांसोबत मिसळ पावचा आनंद घेतला होता.


अजित दादांनी घाडगे मिसळ आणि जोगेश्वरी मिसळ या ठिकाणी मिसळवर ताव मारताना त्यांचं मिसळ प्रेम अनेकदा दिसून आलं होतं. याबाबतचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.गेल्या वर्षी जानेवारीमध्ये अजित पवार यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात मिसळ पाव चुकवल्याबाबत खंत व्यक्त केली होती. यावरूनही त्यांचे मिसळ प्रेम दिसून आले होते.

मिसळ व्यतिरिक्त अजित दादा अनेकदा भेळीचा आस्वाद घेताना दिसले होते. अजित दादांना घरगुती आणि ग्रामीण भागातील साधे खाद्यपदार्थ आवडत. भाकरी, हरभरा डाळ हे पदार्थही त्यांना विशेष आवडत. अनेकदा अजित दादांनी रस्त्यावरील विक्रेत्यांकडून साध्या भाजीपाला खरेदी केला आहे. ते बऱ्याचदा सार्वजनिक कार्यक्रमातही लाडू, चिवडा खाताना दिसले आहेत. ते कायम स्थानिक चवींना पसंती देत.

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अजित दादा मिसळ पावचा आस्वाद घेताना दिसत आहेत. यावेळी ते मिसळ खाताना आणखी रस्सा मागताना दिसत आहेत.

असा हरहुन्नरी नेता हरपल्यामुळे देशभरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. गुरूवारी २९ जानेवारी रोजी बारामती इथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles