नगरच्या राष्ट्रवादीच्या महापौर ज्योती गाडे म्हणाल्या; स्वर्गीय कर्डिले साहेब आज हयात असते तर….

अहिल्यानगर महानगरपालिका महापौर पदासाठी राष्ट्रवादीच्या ज्योती गाडे व उपमहापौर पदासाठी भाजपचे धनंजय जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल

6 फेब्रुवारी रोजी होणार निवडणूक; राष्ट्रवादी-भाजप युतीकडून संयुक्त उमेदवारी

अहिल्यानगर : अहिल्यानगर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली असून, येत्या 6 फेब्रुवारी रोजी महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीकडून महापौर पदासाठी राष्ट्रवादीच्या नगरसेविका ज्योतीताई अमोल गाडे यांनी, तर उपमहापौर पदासाठी भाजपाचे धनंजय कृष्णा भाऊ जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
दोन्ही उमेदवारांनी आपले अर्ज नगरसचिव मेहेर लहारे यांच्याकडे सुपूर्द केले. या वेळी दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी उपमहापौर गणेश भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश घुले, नगरसेवक निखिल वारे, विपुल शेटीया, पुष्कर कुलकर्णी, तसेच नगरसेविका पुष्पाताई बोरुडे, संध्याताई पवार, गीतांजली काळे, शारदाताई ढवण, सतीश शिंदे, जय भोसले, करण कराळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
महापौर पदाच्या उमेदवार ज्योतीताई गाडे म्हणाल्या, “अहिल्यानगरचे नाव बदलल्यानंतर शहराच्या पहिल्या महापौरपदाचा मान मला मिळत आहे, ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. अहिल्यादेवी होळकरांचा आदर्श व वारसा अखंड ठेवण्यासाठी मी काम करीन. स्वर्गीय माझे वडील शिवाजीराव कर्डिले साहेब आज हयात असते तर त्यांना मोठा आनंद झाला असता. त्यांचा वारसा आणि विचार पुढे नेण्यासाठी मी कटिबद्ध आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास समर्थपणे पेलण्याचा मी प्रयत्न करीन, असे त्या म्हणाल्या.
उपमहापौर पदाचे उमेदवार धनंजय जाधव म्हणाले की, “केंद्र, राज्य आणि शहर या तिन्ही पातळ्यांवर राष्ट्रवादी-भाजप युतीचे सत्ताधारी समीकरण असून, नगरकरांना उत्तम सेवा देणे हीच आपली प्राथमिकता आहे. मूलभूत सुविधांपासून विकासाच्या योजनांपर्यंत नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन कार्य करणार आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहीन. त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी सार्थ ठरवेन, असे त्यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles