अजितदादांच्या अंत्यसंस्कारावेळी चोरट्यांचा सुळसुळाट, अहिल्यानगरसह राज्यभरातून आले होते चोरटे
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अंत्यसंस्कारासाठी राज्यभरातून त्यांच्या चहात्यांनी गर्दी केली होती. याच गर्दीचा फायदा घेऊन चोरही आले होते. चोरांनी सुमारे २० लाख रुपये किमतीच्या सोनसाखळ्या आणि रोख रक्कम चोरून नेली आहे. याप्रकरणी बारामती पोलिसांनी गुन्हा दाखल करून आठ आरोपींना अटक केली आहे. त्यामध्ये अहिल्यानगरसह राज्यभरातील आरोपींचा समावेश आहे.
दुःखाच्या प्रसंगातही चोरटच्यांनी हात साफ केल्याने कार्यकर्त्यांना धक्का बसला. उपस्थितांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या व रोख रक्कम चोरीला गेली आहे. सोनसाखळी चोर आणि पाकिटमार यांनी गर्दीचा फायदा उठवल्याचे दिसून येते. यातील काही कार्यकर्त्यांनी बारामती पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली. पोलिसांनी तपास सुरू केला आणि आरोपींना अटक केली.
अशी आहेत आरोपींची नावे
बाळू उर्फ दत्तात्रय बबन धोत्रे (रा. इंदिरानगर, पाथर्डी, जि. अहिल्यानगर सध्या रा. पळसदेव, ता. इंदापूर, जि. पुणे), तुषार कैलास मासाळ (रा.कोरडगाव, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर), राजकुमार बाबुराव आठवले (रा.तलवाडा ता.गेवराई, जि. बीड), मोहम्मद अनीस मोहम्मद युनूस (रा. गवळीपुरा, डिग्रज, यवतमाळ), एजाज भगु मीरावले (रा.गवळीपुरा, डिग्रज, यवतमाळ), मोहम्मद सादिक मोहम्मद गफार (रा. मोतीनगर, डिग्रज, यवतमाळ), नितीन अंकुश गायकवाड (रा.शिक्षक कॉलनी, ता. बीड,जि.बीड).
अजितदादांच्या अंत्यसंस्कारावेळी चोरट्यांचा सुळसुळाट, अहिल्यानगरसह राज्यभरातून आले होते चोरटे
- Advertisement -


