सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याकडे पाहण्याचा एक पूर्णपणे वेगळा आणि वैचारिक दृष्टिकोन मांडला आहे. कोलंबोमध्ये झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर त्यांनी व्यक्त केलेल्या भावनांनी समाजमाध्यमांवर चर्चेला उधाण आले आहे. काटजू यांच्या मते, भारत आणि पाकिस्तान हे मुळात एकच देश आहेत आणि या दोन्ही टीम्स त्यांच्यासाठी ‘स्वतःच्याच’ आहेत.
काटजू यांनी आपल्या पोस्टमध्ये अत्यंत कडक शब्दांत फाळणीवर टीका केली आहे. ते म्हणतात, “भारत आणि पाकिस्तान हे एकच राष्ट्र आहे, जे ब्रिटिशांनी हिंदू आणि मुस्लिमांना आपापसात लढत ठेवण्यासाठी ‘बोगस’ द्विराष्ट्र सिद्धांताच्या आधारे विभागले. ब्रिटिशांचे हे कारस्थान केवळ यासाठी होते की, एकसंध भारत चीनप्रमाणे एक आधुनिक औद्योगिक महासत्ता म्हणून उदयोन्मुख होऊ नये आणि पाश्चात्य उद्योगांना आव्हान देऊ नये.”
मी भारतीय असलो तरी पाकिस्तानच्या टीमलाही मी माझीच टीम मानतो. त्यामुळे काल कोलंबोमध्ये पाकिस्तानचा झालेला पराभव पाहून मला दुःख झाले आहे, जसे अनेक पाकिस्तानी नागरिकांना झाले असेल. जेव्हा एक देश दुसऱ्याशी लढतो तेव्हा ठीक आहे, पण इथे आपण स्वतःशीच लढत आहोत असे मला वाटते.”
केवळ दुःख व्यक्त करून प्रश्न सुटणार नाही, असे सांगत काटजू यांनी पाकिस्तान क्रिकेटमध्ये सुधारणा करण्यासाठी एक क्रांतिकारी सूचना मांडली आहे. त्यांच्या मते, पाकिस्तान सरकारने विद्यमान क्रिकेट बोर्ड बरखास्त करून खालील दिग्गजांचे नवीन बोर्ड स्थापन करावे.


