Thursday, February 19, 2026

खाजगी गुप्तहेर एजन्सी अजितदादांच्या विमान अपघाताचे सत्य समोर आणणार!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत घातपाताचा संशय व्यक्त करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे सध्या दिल्लीत राहून एक महत्त्वाचे काम पार पाडत आहेत. रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्या विमान अपघातामागे काहीतरी काळंबेरं असल्याची शक्यता बोलून दाखवली होती. सरकारने या अपघाताची चौकशी लावण्यापलीकडे फार काही केले नव्हते. त्यामुळे आता रोहित पवार यांनी आपल्या काकांच्या विमान अपघातामागील खरे कारण शोधण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ते सध्या दिल्लीत हवाई क्षेत्रात वैमानिक व अन्य पदांवर राहिलेल्या अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.

अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाचा अहवाल येण्यास वेळ लागू शकतो, असे अधिकाऱ्यांचे मत आहे. मात्र, हा अहवाल लवकरात लवकर मिळावा यासाठी रोहित पवार हे खासगी गुप्तहेरांची मदत घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताचं सत्य लवकरात लवकर समोर आणण्यासाठी रोहित पवार यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

स्वर्गीय अजित दादांच्या दुर्दैवी अपघाताचा आज 20 वा दिवस असून अद्यापही DGCA कडून प्राथमिक चौकशी अहवाल आलेला नाही. तसेच सर्व नियमांचे उल्लंघन करत विमाने चालवणाऱ्या VSR कंपनीविरोधात देखील काहीही कारवाई अद्यापर्यंत झालेली नाही. परिणामी शंका अधिक बळावत चालल्या आहेत. त्यामुळे DGCA ने लवकरात लवकर प्राथमिक चौकशी अहवाल द्यावा तसेच VSR वर योग्य ती कारवाई करावी, अशी पोस्ट रोहित पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles