केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
या योजनेत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये दिले जातात. ही रक्कम तीन महिन्यांच्या कालावधीत हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा केली जाते. मात्र, सध्या ८वा हप्ता अजून प्रलंबित आहे. विशेष म्हणजे पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता जमा होऊन जवळपास दोन महिने उलटले असतानाही नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळालेला नाही.
मो शेतकरी योजनेच्या ८व्या हप्त्यासाठी काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. लाभार्थी यादी अद्ययावत करणे, खात्यांची पडताळणी आणि डेटाबेसमधील त्रुटी यामुळे हप्ता वितरणास विलंब होत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात, होळीच्या सणाच्या आसपास ही रक्कम खात्यात जमा होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.


