राज्यभरात 1 मार्चपासून दूध महागणार, दुध संघाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय

येत्या 1 मार्च पासून राज्यभरात दुध महाग होणार आहे. दुधाच्या दरात प्रतीलिटर 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. खासगी दुध संघाच्या बैठकीत आज हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळं आता ग्राहकांना 1 मार्चपासून दुधाच्या खरेदीसाठी 2 रुपये अधिकचे मोजावे लागणार आहेत.

दरम्यान, दुधाच्या खरेदीत 4 रुपयांनी वाढ झाल्याने हा निर्णय घेतल्याची माहिती दुध संघानं केली आहे. दुध संघाचा विक्रीत 1 रुपये तर वितरकांच्या कमिशनमध्ये 1 रुपयांची वाढ केल्याचा निर्णय झाला आहे. दरम्यान, दुधाच्या दरात वाढ झाल्यानं ग्राहकांच्या खिशाला झळ बसणार आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, दुधाच्या दरात होणारी ही दरवाढ येत्या 1 मार्चपासून लागू होणार आहे. गोकुळ कडून म्हशीच्या दूध विक्री दरामध्ये दोन रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना एक प्रकारे दिलासा मिळाला आहे. याआधी म्हशीचे दूध 68 रुपयांनी विकले जात होते मात्र आता ते 70 रुपयांनी प्रतिलिटर विकले जाणार आहे. आज संध्याकाळ पासून नवे दर लागू होणार आहेत. गोकुळ संचालकांच्या बैठकीमध्ये दूध दरवाढीसंदर्भात महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, दुधाच्या दरात वाढ झाल्यानं ग्राहकांच्या खिशाला अधिकची झळ बसणार आहे. दुधाच्या खरेदीत 4 रुपयांनी वाढ झाल्याने हा निर्णय घेतल्याची माहिती खासजी दुध संघानं दिली आहे. दुध संघाचा विक्रीत 1 रुपये तर वितरकांच्या कमिशनमध्ये 1 रुपयांची वाढ केल्याचा निर्णय झाला असल्याची माहिती देखील खासजी दुध संघाकडून देण्यात आली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles