Friday, February 27, 2026

पारनेर नगरपंचायतीच्या सभागृहाला स्व. अजितदादा पवार यांचे नाव

नगरपंचायत सभागृह व रस्त्यास स्व. अजितदादा पवार यांचे नाव

मासिक सभेत एकमुखी ठराव

पारनेर : पारनेर नगरपंचायतीच्या शुक्रवार दि. २७ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या मासिक सभेत स्व. अजित पवार यांच्या स्मृतींना अभिवादन करत शहरातील खालची वेस परिसरातील मारुती मंदिर ते पंचायत समिती या नगरपंचायतीकडे जाणाऱ्या रस्त्यास ‘स्व. अजितदादा पवार कर्तव्य पथ’ तसेच नगरपंचायतीच्या विद्यमान सभागृहास ‘अजितदादा पवार स्मृती सभागृह’ असे नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. सदर ठराव नगराध्यक्षा डॉ. विद्या कावरे यांनी मांडला असून, उपस्थित सर्व नगरसेवकांनी त्यास एकमुखी पाठिंबा दिला.

यावेळी बोलताना नगराध्यक्षा डॉ. कावरे यांनी सांगितले की, पारनेर शहराच्या विकासात स्व. अजितदादांचे मोलाचे योगदान आहे. तत्कालीन आमदार तथा विद्यमान खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीच्या विविध विकासकामांना गती मिळाली. विशेषतः मुळा धरणाच्या बॅकवॉटरमधून राबविण्यात येणाऱ्या सुमारे ८० कोटी रुपयांच्या शाश्वत पाणी योजनेला तांत्रिक मंजुरी मिळवून देण्यात स्व. अजितदादांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

तसेच देवीभोयरे फाटा ते खडकी (ता. नगर) या रस्त्यासाठी सुमारे ३५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात स्व. अजितदादांचे योगदान असून, सदर काम सध्या प्रगतीपथावर आहे. या रस्त्यास तसेच प्रस्तावित नवीन नगरपंचायत इमारतीलाही स्व. अजितदादांचे नाव देण्याबाबतचा ठराव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

पारनेर तालुका व शहरावर स्व. अजितदादांचे विशेष प्रेम होते. त्यांच्या कार्याच्या स्मृती चिरंतन राहाव्यात आणि भावी पिढ्यांना त्यांच्या योगदानाची जाणीव व्हावी, या हेतूने नगरपंचायतीने एकमताने हा निर्णय घेतल्याचे डॉ. कावरे यांनी स्पष्ट केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles