नोटा घेऊन जाणारे लष्काराचे विमान कोसळले, १५ जणांचा मृत्यू, अपघातानंतरचा भयानक व्हिडिओ

खराब हवामानामुळे बोलिव्हियामध्ये लष्कराचे विमान कोसळले. नव्या चलनातील नोटा घेऊन जाताना खराब हवामानामुळे हरक्यूलिस सी-१३० विमानाचा अपघात झाला. यामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३० जण जखमी झाले आहेत. बोलिव्हियाची राजधानी ला पाझजवळील एल अल्टो शहरात हा अपघात झाला. संरक्षण मंत्रालयाकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे. नोटा घेऊन जाणारे आर्मीचे हरक्यूलिस सी-१३० विमान खराब हवामानामुळे शुक्रवारी संध्याकाळी एल अल्टोमध्ये रस्त्यावर कोसळले. त्यावेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तर ३० जण जखमी झाल्याचे समजतेय. जखमींना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, बोलिव्हियाची राजधानी ला पाझजवळ लष्करी मालवाहू विमान कोसळले. हे विमान नवीन नोटा घेऊन जात होते. विमान कोसळल्यानंतरचे भयंकर दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्या घटनेचा अन् तेथील परिस्थितीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फुटेजमध्ये गोंधळलेले दृश्य दिसून आले. अपघाताच्या ठिकाणी गर्दी जमली होती, काही लोक रस्त्यावर विखुरलेल्या नोटा गोळा करताना दिसत होते. स्थानिक अधिकाऱ्यांनी पाहणाऱ्यांना पांगवण्यासाठी पाण्याच्या नळीचा वापर करताना पाहिले.
https://x.com/AZ_Intel_/status/2027522785807937537?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E2027522785807937537%7Ctwgr%5E85498e1dfb9cc9616a7b31f403e7eb6cc7a77e79%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fsaamtv.esakal.com%2Fnational-international%2Fmilitary-plane-carrying-currency-crashes-near-la-paz-15-dead-and-dozens-injured-in-bolivia-tragedy-nck90
विमान अनेक कार आणि वाहनांना धडकले. या दुर्घटनेत मोठे नुकसान झाले. स्थानिक माध्यमांनी प्रसारित केलेल्या फोटोंमध्ये विमानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसतेय. अनेक वाहने रस्त्यावर दिसत आहेत. अपघातानंतर एल अल्टो आंतरराष्ट्रीय विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले आहे. या अपघातामधील ३० जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. मानातील लोकांची संख्या आणि त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles