देवी मंदिरातून चांदीचे सिंहासन, सोन्याचे गंठण चोरीला; नगर तालुक्यातील घटना

अहिल्यानगर-शेंडी (ता. अहिल्यानगर) गावातील मळगंगा देवी मंदिरातून चोरट्याने देवीच्या गळ्यातील सोन्याचे गंठण आणि देवीच्या पाठीमागे बसविण्यात आलेले चांदीचे सिंहासन चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत एकूण 1 लाख 20 हजार रूपयांचा ऐवज चोरीला गेला असून, या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सोमवारी (24 ऑगस्ट) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश अरूण कराळे (वय 31, रा. शेंडी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादी प्रकाश कराळे हे शेंडी येथे कुटुंबासह राहत असून ते दररोज पहाटेच्या सुमारास शेंडी येथील मळगंगा देवी मंदिरात दर्शनासाठी जातात. मंदिरातील देवीच्या पाठीमागे चांदीचे सिंहासन बसविण्यात आले असून, देवीच्या गळ्यात सोन्याचे गंठण असल्याची त्यांना माहिती होती.

दरम्यान, रविवारी (23 ऑगस्ट) सायंकाळी सात वाजेपासून सोमवारी पहाटे पाच वाजेपर्यंतच्या कालावधीत चोरट्याने मंदिरातील सदर ऐवज लंपास केल्याचा संशय आहे. सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कराळे हे नेहमीप्रमाणे दर्शनासाठी मंदिरात गेले असता त्यांना देवीच्या पाठीमागील चांदीचे सिंहासन तसेच देवीच्या गळ्यातील सोन्याचे गंठण दिसून आले नाही. त्यानंतर त्यांनी त्यांचे मित्र महेश भगत यांना फोन करून मंदिरात बोलावले. दोघांनी मंदिराच्या परिसरात तसेच आजूबाजूला चोरीच्या ऐवजाबाबत चौकशी केली.

मात्र कोणतीही माहिती मिळाली नाही. मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता एक व्यक्ती चोरी करत असल्याचे दिसून आले आहे. यानंतर पोलिसांत धाव घेत फिर्याद दाखल केली. चोरीस गेलेल्या ऐवजात सुमारे 45 भार वजनाचे चांदीचे सिंहासन आणि एक तोळा वजनाचे सोन्याचे गळ्यातील गंठण, असा एकूण 1 लाख 20 हजार रूपयांचा ऐवज असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles