प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळतानाच डॉ. सुजय विखे पाटील यांना पक्षाने सोपविली नवी जबाबदारी

डॉ. सुजय विखे पाटील यांची आयुष्मान भारत प्रकोष्ठाच्या प्रदेश प्रभारीपदी नियुक्ती

प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळतानाच पक्षाने सोपविली नवी जबाबदारी

अहिल्यानगर, : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आज, दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी पक्षाच्या विविध प्रकोष्ठांच्या प्रभारी व सहप्रभारींच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यामध्ये भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांची आयुष्मान भारत प्रकोष्ठाच्या प्रदेश प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर डॉ. विखे पाटील यांच्याकडे पक्षाने आणखी एक महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे. पक्ष संघटनेच्या कामात विविध स्तरांवर सक्रिय असलेल्या डॉ. विखे पाटील यांच्या कामाची दखल घेत ही जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आल्याचे पक्षातील कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे.

डॉ. सुजय विखे पाटील यांनी आरोग्य, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सातत्याने काम केले आहे. प्रदेश उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतरही त्यांनी पक्ष संघटनेच्या कामात सक्रिय सहभाग कायम ठेवला आहे. राज्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवत पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडण्यावर त्यांनी भर दिला आहे.

आता आयुष्मान भारत प्रकोष्ठाच्या प्रदेश प्रभारीपदाची जबाबदारी मिळाल्याने केंद्र शासनाच्या आरोग्यविषयक योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासह प्रकोष्ठाचे काम राज्यभर अधिक प्रभावीपणे राबविण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटनेच्या कामात डॉ. विखे पाटील यांच्यावर सातत्याने नव्या जबाबदाऱ्या सोपविल्या जात आहेत. प्रदेश उपाध्यक्षपदानंतर आयुष्मान भारत प्रकोष्ठाच्या प्रदेश प्रभारीपदी झालेली ही नियुक्ती पक्ष नेतृत्वाचा त्यांच्यावरील विश्वास अधोरेखित करणारी असल्याची भावना व्यक्त होत आहे.

डॉ. सुजय विखे पाटील यांच्या या नियुक्तीबद्दल भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले असून, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles