ज्ञानराधा मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटी प्रकरण अर्चना कुटे यांना ईडीकडून अटक

ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी प्रकरणात ईडीची मोठी कारवाई करण्यात आली आहे. आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लॉन्डरिंग प्रकरणी अर्चना कुटे यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यांना मुंबईतील विशेष न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. न्यायालयाकडून अर्चना कुटे यांना ७ मार्च २०२६ पर्यंत ईडी कोठडी देण्यात आली आहे.मे ते जुलै २०२४ दरम्यान महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यात गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याच्या FIR नोंद करण्यात आली आहे. गुंतवणूकदारांना १२ ते १४ टक्के परताव्याचे आमिष दाखवून ठेवी गोळा केल्याचा आरोप आहे. तपासात सुमारे २,४६७ कोटी रुपयांचा निधी कुटे ग्रुपशी संबंधित कंपन्यांना कर्जाच्या नावाखाली वळवल्याचा खुलासा आहे. आवश्यक कागदपत्रे, तारण किंवा निधीचा उद्देश नसताना व्यवहार केल्याचा ईडीचा आरोप आहे. यापूर्वीच सुरेश कुटे यांना अटक करण्यात आली आहे. विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ईडीकडून छापेमारी करत १,६२१.८९ कोटी रुपयांची चल-अचल मालमत्ता जप्त करण्यात आली आहे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles