Tuesday, March 10, 2026

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लवकरच नोकरभरती; राज्यात १ लाख १२ हजार रिक्त पदे

मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामधील वर्ग तीन व चार मधील रिक्त पदे लवकरात लवकर भरली जाणार आहेत. रिक्त पदांमुळे पालिकांच्या कामकाजावर परिणाम होऊ नये, यासाठी अधिकाऱ्याकडे अतिरिक्त कार्यभाराचे वाटप केले गेले आहे, असे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सोमवारी विधानसभेत सांगितले. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये एक लाख १२ हजार ७६९ रिक्त पदे आहेत.
राज्यातील नगरपरिषद, नगरपालिका, नगरपंचायती आणि महानगरपालिकामध्ये पुरेसा कर्मचारी अधिकारी वर्ग नसल्याने कामकाजावर परिणाम होत आहे. त्याचा परिणाम नागरी विकास कामांवर होत आहे, यासंदर्भात सुलभा गायकवाड यांनी लक्षवेधी सूचना मांडली. राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत मध्ये २ हजार ३०८ पदे अ, ब, क श्रेणीतील क व ड आणि सफाई कामगार असे ६ हजार १२७ तर २९ पालिकांमध्ये एक लाख ४ हजार ३३४ पदे रिक्त आहेत. ही नोकरभरती लवकरच केली जाईल असे मिसाळ यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत अभिजित पाटील, प्रवीण दटके यांनी उपप्रश्न विचारले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles