काही दिवसांपूर्वीच मराठमोळ्या इन्फ्लूएन्सर प्रथमेश कदमचं निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने संपूर्ण मनोरंजनसृष्टीत अनेकांना धक्का बसला होता. आता आणखी एका लोकप्रिय रीलस्टारच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर अरुण तुपे याचं काल (10 मार्च) निधन झालं. राहत्या घरीच मृत अवस्थेत आढळल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तरुण वर्गात अतिशय लोकप्रिय असलेल्या अरुण तुपेने 24 तासांपूर्वीच एक रील शेअर केली होती. पण दुसऱ्याच दिवशी त्याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्याच्या मृत्यूचं कारण शवविच्छेदन अहवालातून समोर येईल.छत्रपती संभाजी नगरच्या बालाजी नगरमध्ये राहणारा प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अरुण तुपे याचे मंगळवारी निधन झालं. राहत्या घरात त्याचा मृतदेह आढळल्याने त्याच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासल्यानंतर मृत घोषित केलं. त्याचा मृतदेह घाटी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या अहवालातूनच कारण स्पष्ट होऊ शकेल. त्याच्या मृत्यूनंतर अनेकांनी त्याच्या शेवटचा रील वर कमेंट करत शोक व्यक्त केला आहे. त्याचे अनेक जवळच्या मित्रांना, नातेवाईकांना आणि चाहत्यांना त्याच्या अचानक निधनाने मोठा धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण महाराष्ट्रातील तरुण पिढीमध्ये लोकप्रिय असणारा हा रीलस्टार अरुण तुपे त्याचा instagram वर अनेक रील्स पोस्ट करायचा. कॉमेडी गंभीर कंटेंट तो चाहत्यांसोबत शेअर करायचा. अरुणला अपस्मारचा (फिट) त्रास असल्याचं अनेक जवळचे लोक सांगतायत.
महाराष्ट्राला हसवणाऱ्या लोकप्रिय रिलस्टारचं निधन; राहत्या घरात मृतदेह आढळल्याने खळबळ , 24 तासांपूर्वीच शेअर केलेला व्हिडीओ
- Advertisement -


