Tuesday, March 17, 2026

पाकिस्तानच्या काबूल हल्ल्यात 400 जणांचा मृत्यू.. संतापलेला राशीद खान म्हणाला.. रमजानच्या पवित्र महिन्यात..

अमेरिका आणि इराण
यांच्यातील युद्धाने जगाला टेन्शन दिलं असताना दुसरीकडे पाकिस्तानने सोमवारी रात्री पुन्हा एकदा अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला आहे. स्थानिक माध्यमांनुसार, पाकिस्तानी हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी राजधानी काबूलमधील अनेक भागांना लक्ष्य केलं अन् यात 400 अफगाणी लोकांचा मृत्यू झाला, तर 250 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

पाकिस्तानच्या या नापाक कृत्यानंतर अफगाणिस्तानचा स्टार क्रिकेटर राशीद खान याने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. काबूलमध्ये पाकिस्तानी हवाई हल्ल्यांमुळे झालेल्या नागरिकांच्या मृत्यूच्या ताज्या वृत्तांमुळे मला खूप दुःख झालंय. जाणूनबुजून किंवा चुकून, नागरिकांची घरे, शैक्षणिक सुविधा किंवा वैद्यकीय पायाभूत सुविधांना लक्ष्य करणं हा युद्ध गुन्हा आहे, असं राशीद खान म्हणाला. विशेषतः रमजानच्या पवित्र महिन्यात मानवी जीवनाची केलेली अवहेलना ही वेदनादायक आणि गंभीर चिंताजनक आहे, असंही राशीद यावेळी म्हणाला.

पाकिस्तानच्या अशा कृतीमुळे केवळ फूट आणि द्वेष निर्माण होईल. मी संयुक्त राष्ट्र आणि इतर मानवाधिकार संस्थांना या नवीनतम अत्याचाराची सखोल चौकशी करण्याचे आणि गुन्हेगारांना जबाबदार धरण्याचं आवाहन करतो. या कठीण काळात मी माझ्या अफगाण लोकांसोबत उभा आहे. आपण बरं होऊ आणि एक राष्ट्र म्हणून आपण उठू. आपण नेहमीच असे करतो. इन्शाअल्लाह, असं राशीद खानने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles