गेल्या आठवड्याभरात सोने आणि चांदीच्या दरात मोठी तेजी पाहायला मिळाली होती. अमेरिकन डॉलर आणि बाँड यील्डमध्ये झालेल्या घसरणीचा परिणाम सोन्याच्या किमतीवर झाला आणि दरात सातत्याने वाढ झाली. मात्र आता सोन्याच्या दरात काहीशी घसरण झाल्याचे दिसून येत आहे. आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात ७७० रुपयांची घट झाली असून, १ तोळा म्हणजेच १० ग्रॅम सोन्याचा भाव १,६२,९८० रुपयांवर आला आहे. सोन्याच्या दरातील या घसरणीमुळे खरेदीदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. विशेषतः लग्नसराई किंवा गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरू शकतो. दरम्यान, २२ कॅरेट सोन्याचा भाव २४ कॅरेटपेक्षा कमी असून, १८ कॅरेट सोन्याचे दर त्याहून कमी आहेत. त्यामुळे सोन्याची खरेदी करण्यापूर्वी आजचे २२ कॅरेट, २४ कॅरेट आणि १८ कॅरेटचे ताजे दर जाणून घेणे महत्त्वाचे आहे. बाजारातील बदलांनुसार सोन्याच्या किमतीत पुढील काळातही चढ-उतार होण्याची शक्यता आहे.
प्रमुख शहरांमधील सोन्या-चांदीचे ताजे दर
शहर २४ कॅरेट सोनं २२ कॅरेट सोनं
दिल्ली १,६२,६४० १,४८,९२२
मुंबई १,६२,७४० १,४९,१७८
बंगळुरू १,६२,८७० १,४९,२९८
कोलकाता १,६२,५२० १,४८,९७७
हैदराबाद १,६३,००० १,४९,४१७


