नगरमध्ये शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मोठा दिलासा ; दुसर्‍या हप्त्यात तालुकानिहाय लाभ

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जदार शेतकर्‍यांसाठी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जाहीर करण्यात आला असून, त्यामध्ये 36 हजार 424 शेतकर्‍यांच्या खात्यावर 348 कोटी 51 लाख रूपये वर्ग करण्यात आले आहेत. पहिल्या व दुसर्‍या हप्त्याची एकत्रित आकडेवारी पाहता, जिल्हा बँकेचे आतापर्यंत 1 लाख 2 हजार 563 शेतकरी कर्जमुक्त झाले असून, त्यांच्या खात्यावर एकूण 975 कोटी 98 लाख 48 हजार 631 रूपये वर्ग करण्यात आले आहेत.

दरम्यान, कर्जमाफीच्या आधार प्रमाणीकरण करण्यासाठी प्राप्त 1 लाख 32 हजार 700 शेतकर्‍यांपैकी 1 लाख 22 हजार 445 शेतकर्‍यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेले असून त्याचे प्रमाण 92 टक्के आहे. त्यापैकी आजपर्यंत पहिला आणि दुसरा टप्पा मिळून आज अखेर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 1 लाख 2 हजार 563 शेतकर्‍यांच्या खात्यावर 976 कोटी व राष्ट्रीय व व्यापारी बँकांच्या 12 हजार 652 शेतकर्‍यांच्या खात्यावर 138 कोटी असे एकूण अहिल्यानगर जिल्ह्यातील 1 लाख 15 हजार 215 शेतकर्‍यांच्या खात्यावर 1 हजार 114 कोटी रूपये जमा झालेले आहेत.

कर्जमुक्ती योजनेचा पहिला हप्ता 7 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यावेळी जिल्हा बँकेच्या 66 हजार 139 शेतकर्‍यांचा समावेश करण्यात आला होता. या शेतकर्‍यांच्या खात्यावर 627 कोटी 47 लाख 26 हजार 562 रूपये वर्ग करण्यात आले होते. त्यानंतर सोमवारी (24 ऑगस्ट) दुसरा हप्ता जाहीर करण्यात आला. या हप्त्यात जिल्हा बँकेच्या 36 हजार 424 शेतकर्‍यांचा समावेश असून, त्यांच्या खात्यावर 348 कोटी 51 लाख रूपये वर्ग झाले आहेत.

दोन हप्त्यांमध्ये कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकर्‍यांची संख्या एक लाखाच्या पुढे गेल्याने जिल्ह्यातील शेतकरी वर्गाला मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. विशेषतः पीक कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या शेतकर्‍यांना या कर्जमाफीमुळे आगामी खरीप व रब्बी हंगामासाठी आर्थिक नियोजन करण्यास मदत होणार आहे.

अकोले तालुक्यात 1 हजार 835 शेतकर्‍यांना 16 कोटी 58 लाख 96 हजार रूपये, जामखेडमध्ये 2 हजार 446 शेतकर्‍यांना 2 कोटी 36 लाख 19 हजार रूपये, कर्जतमध्ये 2 हजार 61 शेतकर्‍यांना 20 कोटी 88 लाख 40 हजार रूपये, तर कोपरगावमध्ये 628 शेतकर्‍यांना 6 कोटी 18 लाख 72 हजार रुपये मिळाले. अहिल्यानगर तालुक्यात 1 हजार 841 शेतकर्‍यांना 15 कोटी 80 लाख 43 हजार रूपये, पारनेरमध्ये 1 हजार 446 शेतकर्‍यांना 10 कोटी 7 लाख 92 हजार रुपये, पाथर्डीत 2 हजार 68 शेतकर्‍यांना 16 कोटी 13 लाख 42 हजार रूपये, तर राहाता तालुक्यात 794 शेतकर्‍यांना 6 कोटी 34 लाख 23 हजार रूपयांचा लाभ मिळाला आहे. संगमनेर तालुक्यातील 1 हजार 536 शेतकर्‍यांना 13 कोटी 42 लाख 90 हजार रुपये, तर श्रीरामपूरमधील 1 हजार 654 शेतकर्‍यांना 14 कोटी 46 लाख 3 हजार रूपये वर्ग करण्यात आले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles