राजकारणातील मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह ९ नेत्यांची जाणार आमदारकी

राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 25 मार्चला संपणार आहे. विधीमंडळाचे शेवटचे तीनच दिवस शिल्लक असल्याने विधिमंडळात एकीकडे आमदारांची कामकाजाची लगबग सुरू आहे. त्यातच आता राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ९आमदारकी जाणार असल्याची माहिती समोर आली. ठाकरेंची आमदारकीचा कार्यकाळ १३ मे २०२६ रोजी संपणार असल्याने हे सदस्य विधानपरिषदेतून निवृत्त होणार आहेत. उद्धव ठाकरेंसह ९ नेत्यांची आमदारकी का जाणार आहे

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह 9 आमदारांची मुदत 13 मे 2026 रोजी संपणार आहे. हे सदस्य विधान परिषदेतून निवृत्त होणार आहेत. त्यामुळे या 9 आमदारांचा कार्यकाळ लवकरच समाप्त होत आहे. हे त्यांचे हे शेवटचे अधिवेशन असणार आहे. मे महिन्यात त्यांचा कालवधी संपणार असल्याने पुढच्या महिन्यात या रिक्त जागेसाठी निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे.

दरम्यान विधानपरिषदेतून रिक्त होत असलेल्या जागेसाठी विधानसभेतील आमदारातून निवडून द्यावयाच्या आहेत. त्यामुळे येत्या काळात या नऊ जागेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच पाहावयाला मिळेल.

सोमवारी विधानपरिषदेत उद्धव ठाकरे यांच्यासह कार्यकाळ संपत असलेल्या नऊ आमदारांना निरोप देण्यात येणार आहे. यात भाजपचे 4, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा 1, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा 1, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा 1, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 तर काँग्रेसचा 1 सदस्य निवृत्त होणार आहेत.

या नेत्यांची आमदारकी जाणार

उद्धव ठाकरे,

डॉ. नीलम गोऱ्हे

अमोल मिटकरी

शशिकांत शिंदे

राजेश राठोड

रणजितसिंह मोहिते पाटील

संदीप जोशी

दादाराव केचे

संजय केनेकर हे सदस्य निवृत्त होत आहेत

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles