पेट्रोल-डीझेलच्या किंमतींचा भडका उडणार? केंद्र सरकारचं मोठं विधान, LPG तुडवड्यावरही दिली महत्वाची माहिती

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे भारतात उर्जासंकट निर्माण झालं आहे. घरगुती गॅस महागला आहे. गॅस बुकिंग करूनही तो वेळेवर मिळत नाहीये. मोठ्या प्रमाणात काळ्याबाजारच्या घटना वाढत आहेत. महाराष्ट्रातही गॅस सिलिंडरच्या पुरवठ्याबाबत काळ्या बाजाराची काही प्रकरणं समोर आली आहे. दुसरीकडे अनेक अफवांचेही पेव फुटले आहे. गॅस सिलिंडरच्या पुरवठ्याबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. सोबतच पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठाही खंडीत होणार आहे, अशी अफवा अनेक ठिकाणी पसवरली जात आहे. त्यामुळे कोल्हापूरसारख्या जिल्ह्यात काही ठिकाणी पेट्रोलच्या विक्रीत 30 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. असे असतानाच आता प्रशासनाचा एक मोठा निर्णय समोर आला आहे. आता प्रत्येक दुचाकीसाठी फक्त 200 रुपयांचेच पेट्रोल मिळेल, असा सरकारी आदेश काढण्यात आला आहे.

हा आदेश कोल्हापूर प्रशासनाने काढला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोल पंपांवर होत असलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. जिल्हा प्रशासनाकडून दुचाकीसाठी 200 रुपये तर तीन चाकी आणि चार चाकी वाहनांसाठी दोन हजार रुपये पेट्रोल विक्रीची मर्यादा घालून देण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसात वाढपेट्रोल आणि डिझेल विक्रीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे समतोल साधण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्याची सूचना जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल पंप चालकांना देण्यात आली आहे.

पीएनजी म्हणजेच पाइप्ड नॅचरल गॅस विस्तारावर भर देत सरकारने मंगळवारी आणखी एक गॅझेट नोटीफिकेशन जारी केलंय. ज्यामध्ये अर्ज शुल्क आणि मंजुरीची अंतिम मुदत कमी केली आहे.

सीएनजी वाहतुकीसाठी देखील पूर्ण प्रमाणात उपलब्ध करून दिला जातोय. अनेक कंपन्या 500 रूपयांपर्यंत मोफत गॅस किंवा सिक्योरिटी डिपॉजिट माफ करण्याला प्रोत्साहन देत आहेत. पीएनजीच्या विस्ताराला पाठिंबा दिल्यास राज्यांना अतिरिक्त 10 टक्के व्यावसायिक एलपीजी देण्याचा प्रस्तावही सरकारने ठेवला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles