अलिकडेच प्रियांका चोप्राचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, अभिनेत्री अमृतसरला आहे. अमृतसरच्या गोल्डन टेम्पलला (Golden Temple) अभिनेत्रीनं भेट दिली. तसेच सेवा केली. इतर भक्तांसोबत बसून तिने भांडी घासली. याचा व्हिडीओही सोशल मीडियात व्हायरल होत आहे. प्रियांका नेमकं शुटिंगसाठी अमृतसरला गेली आहे की भेट देण्यासाठी, हे अद्याप समोर आलेलं नाही. दरम्यान, अभिनेत्री गोल्डन टेम्पलमध्ये सेवा करत असल्यामुळे तिचं विशेष कौतुक करण्यात येत आहे.
व्हिडीओत आपण पाहू शकतो की, प्रियांकाने खास क्रिम कलरचा ड्रेस घातला आहे. तसेच डोक्यावर ओढणी घेऊन ती भांडी घासत आहे. माहितीनुसार, प्रियांका चोप्रा आधी गोल्डन टेम्पल पोहोचली. तिथे तिने आशीर्वाद घेतला. तसेच ती लंगर हॉलवर गेली. यावेळी ती भांडी घासताना दिसली. प्रियांका तिथे बराच वेळ उपस्थित होती. यापूर्वी तिने गुरु ग्रंथ साहिब यांच्यासमोर नतमस्तक होऊन नमस्कार केला. याचा व्हिडीओही सोशल मीडियात व्हायरल होत आहे. https://x.com/thind_akashdeep/status/2038937460525383735?s=20
प्रियांकाने नुकतंच इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये आपण पाहिलं असेल ती, पंजाबी जेवणाचा आस्वाद घेत आहे. यापूर्वी ती अमृतसर एअरपोर्टमध्ये स्पॉट झाली. तिनं आपल्या फॅन्ससोबत फोटोशूटही केले.


