बस चालक सेवानिवृत्त होताच मित्राला खांद्यावर उचलून दिला निरोप; व्हिडीओने अनेकांचे जिंकले मन

मैत्री हे आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर नातं असते जे आपण स्वत: निवडतो आणि आयुष्यभर जपतो. मैत्रीमध्ये स्वार्थ नसतो, द्वेष नसतो, इर्षा नसते, भेदभाव नसतो…..असतो तो फक्त विश्वास. विश्वासाच्या धाग्याने घट्ट बांधलेले नातं म्हणजे मैत्री. संकटात साथ न सोडता, दु:खात आधार देऊन, न विसरता एकमेकांच्या सुखात आनंद होऊन, वाट चुकल्यावर योग्य वाट दाखवून, आयुष्यात काहीही झाले तरी एकमेकांवर कायम विश्वास ठेवणारे नाते म्हणजे मैत्री. तुमच्या आनंदात आनंदी होणारा, तुमच्या यशाचे कौतुक करणारा मित्र भेटणे यापेक्षा सुंदर काही असू शकत नाही.

अशाच एका मैत्रीच्या नात्याची झलक दाखवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओ एसटी कर्मचाऱ्यांचा आहे. व्हिडीओमध्ये निस्वार्थ मैत्रीचा एक सुंदर क्षण कैद झाला आहे. अनोख्या पद्धतीने त्यांनी मित्राचा सेवानिवृत्तीचा क्षण साजरा केला आहे. या व्हिडीओने अनेकांचे मन जिंकले आहे.व्हायरल व्हिडीओ हा गुहागर बस आगारातील असल्याची माहिती मिळते. एसटी चालक उदय जोशी यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांच्या मित्रानं त्यांना खांद्यावर उचलून घेत अनोख्या व भावनिक पद्धतीनं निरोप दिला. एसटी बसमधून थेट खांद्यावर बसवून त्यांना बस आगारात घेऊन जाताना दिसत आहे. काही सेकंदाचा व्हिडिओ नेटकऱ्यांचे मन जिंकत आहे. दोघांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.

 

व्हायरल व्हिडीओ ved_46_याइंस्टाग्रामवरून पोस्ट करण्यात आला आहे.

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles