राहुरी विधानसभा पोटनिवडणुक; निर्धार भाजपा-महायुतीचा, ‘राहुरी’ पुनर्विजयाचा !

निर्धार भाजपा-महायुतीचा, ‘राहुरी’ पुनर्विजयाचा !

राहुरी विधनासभा मतदार संघाची निवडणूक
.स्व.शिवाजीराव कर्डीले यांच्या आठवणींना उजाळा देणारी आहे.जनता महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी असली तरी प्रत्येक कार्यकर्त्याने सकारात्मक दृष्टीकोन ठेवून मतदारापर्यत पोहचविण्याची जबाबदारी घेण्याचे आवाहन जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.सोमवारी ६एप्रिल रोजी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ.रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राहुरी विधनासभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.आ.मोनिका राजळे जेष्ठ नेते सुभाष पाटील भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग उमेदवार अक्षय कर्डीले सुरसिंग पवार नामदेव ढोकणे आरपीआयचे सुरेंद्र थोरात काशिनाथ लवांडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित साकळाई योजनेच्या कामाला १२३४कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा लाभक्षेत्रातील शेतकर्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.

आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की,राहुरी मतदारसंघाच्या विकासासाठी स्व.शिवाजीराव कर्डीले यांची धडपड होती.त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने ही निवडणुक महत्वाची आहे.त्यामुळे एकमेकाबद्दल गावात हेवेदावे करण्यापेक्षा सकारात्मक दृष्टीकोन ठेवून आपल्याला निवडणुकीला सामोरे जायचे आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश सर्व क्षेत्रात प्रगती करीत आहे.जागतिक स्तरावर अस्थिरतेचे वातावरण आहे.कोव्हीड संकटानंतर आशा वातावरणात सुध्दा देश यशस्वीपणे वाटचाल करतो हे प्रधानमंत्र्यांच्या धोरणाचे यश आहे.परंतू इंधन आणि गॅसच्या टंचाईवरून सरकारला बदनाम करण्याच्या होणार्या प्रयत्नांना कार्यकर्त्यानी उतर देण्याचे मंत्री विखे पाटील यांनी सूचित केले.

विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्याची भूमिका महत्वाची ठरणार असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार घेत असलेल्या निर्णय महत्वाचे आहेत.केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची माहीती प्रचाराच्या दरम्यान मतदारापर्यत घेवून जाण्याचे आवाहन त्यांनी केले.

महायुती सरकारच्या माध्यमातून जिल्हयातील सिंचन प्रकल्पांसाठी मोठा निधी उपलब्ध होत आहे.वांबोरी चारी साकळाई योजनेचे स्व.शिवाजीराव कर्डीले यांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने झालेले निर्णय महत्वाचे आहेत.वर्षानुवर्ष दुष्काळ पाहीलेल्या भागाला पाणी देण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यामातून होत आहे.भविष्यात राहुरी तालुक्यातील औद्योगिक विकासासाठी काम करून रोजगार निर्मिती करण्याच्या दृष्टीने होणारी निवडणूकीला सकारात्मकतेने सामोरे जाण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील केले.

आ.मोनिका राजळे यांनी आपल्या भाषणात स्व.कर्डीले यांच्या कार्याला उजाळा देवून प्रत्येकाने स्वता अक्षय कर्डीले समजून निवडणुकीला सामोरे जाण्याचे आवाहन केले.तालुक्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी साकळाई योजनेचा झालेला निर्णय निवडणुकीसाठी शुभसंकेत असल्याचे सागितले.सुभाष पाटील दिलीप भालसिंग अक्षय कर्डीले यांची भाषण झाली.

काॅग्रेस पक्षाने राहुरी विधनासभा निवडणुक लढविण्याच्या घेतलेल्या निर्णयावर माध्यमांशी बोलतांना मंत्री विखे पाटील म्हणाले की महायुतीचा विजय निश्चित आहे.थोरातांनी राहुरीपेक्षा संगमनेरची निवडणुक गांभिर्याने घ्यायला हवी होती.
अशोक खरात यांच्या प्रकरणाबाबत थोरातांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना या प्रकरणाचे पाळमुळे शिर्डीत की संगमनेर मध्ये हे चौकशी समितीतून समजेल असे सुचक वक्तव्य मंत्री विखेंनी केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles