बिहारच्या राजकारणात मोठा बदल ;बिहारमध्ये पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री होणार

 

देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा बिहार चर्चेत आलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार राज्यसभा खासदार होत पुन्हा नवी दिल्लीत राष्ट्रीय राजकारणात सक्रीय होत आहेत. त्यामुळं बिहारमध्ये भाजपला पहिल्यांदा मुख्यमंत्रिपद मिळणार अशा चर्चा सुरु आहेत. बिहारमध्ये नव्या सरकारच्या स्थापनेसंदर्भात तयारी जोरदार सुरु आहे . बिहारमधील सत्ताधारी जदयू आणि भाजपनं मंगळवारी त्यांच्या आमदारांची बैठक बोलावली आहे.

एनडीएकडून देखील आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. त्या बैठकीत नव्या मुख्यमंत्र्यांची निवड केली जाण्याची शक्यता आहे. नितीश कुमार बिहारच्या मुख्यमंत्रि‍पदाचा मंगळवारी राजीनामा देतील अशी शक्यता आहे. यामुळं नव्या सरकारच्या स्थापनेसंदर्भात दिल्लीपासून पाटणा पर्यंत घडामोडी वाढल्या आहेत.

बिहारच्या राजकारणात मोठा बदल होणार आहे. नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. त्यांच्याजागी नव्या मुख्यमंत्र्याची निवड झाली आहे. सम्राट चौधरी यांची बिहारच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे. ते बिहार भाजपमधील मोठे नेते आहेत. सम्राट चौधरी यांचं नावं बिहारच्या मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित झालं आहे. नितीश कुमार यांचे सुपूत्र निशांत कुमार उपमुख्यमंत्री बनू शकतात. उद्या 15 एप्रिलला 11 वाजता लोकभवनात शपथ ग्रहण समारंभ होणार आहे. त्यात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. बिहार राज्यपालांच्या सचिवाने सोमवारी सम्राट चौधरी यांची भेट घेतली होती. लोकभवनात होणाऱ्या शपथ ग्रहण समारंभासंबंधी ही भेट झाली होती. शपथविधी सोहळ्यात कोण-कोण बड्या आसामी सहभागी होणार, याची पूर्ण माहिती घेतली. संभाव्य मंत्र्यांच्या लिस्टबद्दल सम्राट चौधरी यांनी राज्यपालांच्या सचिवांशी चर्चा केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles