नगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्याचा अंमलदार 35 हजार रूपयांच्या लाचेच्या जाळ्यात

अहिल्यानगर-शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस अंमलदाराला 35 हजार रूपयांची लाच स्वीकारताना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. बुधवारी (15 एप्रिल) सायंकाळी तोफखाना पोलीस ठाणे परिसरात ही कारवाई करण्यात आली. अनिल गोसावी असे पकडलेल्या पोलीस अंमलदाराचे नाव असून या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

छळ प्रकरणी पीडित विवाहितेने पतीविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान संबंधित संशयित आरोपीला मदत करण्यासाठी पोलीस अंमलदार अनिल गोसावी याने तक्रारदाराकडे 50 हजार रूपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. या संदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. बुधवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास तोफखाना पोलीस ठाणे परिसरात ही कारवाई करण्यात आली.

सापळ्यानुसार, गोसावी याने 50 हजारांच्या मागणीपैकी 35 हजार रूपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती. तक्रारदाराकडून 35 हजार रूपये स्वीकारत असताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. या घटनेची माहिती पोलीस दलात पसरताच पोलीस ठाण्यात मोठी खळबळ उडाली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गोसावी याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles