Ahilyanagar: विवाहित अल्पवयीन मुलीवर सासरी अत्याचार सात जणांविरूध्द गुन्हा दाखल

अहिल्यानगर-एका अल्पवयीन मुलीचा (वय 13) विवाह लावून देऊन तिचा शिंदोडी (ता. संगमनेर) येथे छळ करून अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात सात जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना सन 2024 पासून 10 एप्रिल 2026 पर्यंत फिर्यादीच्या सासरी शिंदोडी येथे घडली आहे. सदरचा गुन्हा तपासकामी घारगाव (ता. संगमनेर) पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

पीडित अल्पवयीन मुलीचे मुकींदपूर, नेवासा फाटा (ता. नेवासा) येथील आई, वडिल व मध्यस्थी तसेच, शिंदोडी येथील सासू, सासरे, दीर आणि पती यांच्याविरूध्द हा गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी मुळची मुकींदपूर, नेवासा फाटा येथील असून तिचा विवाह शिंदोडी येथील तरूणासोबत झाला होता.
फिर्यादी अल्पवयीन असल्याचे माहित असूनही संशयित आरोपींनी संगनमत करून तिचा विवाह लावून दिला.

लग्नानंतर फिर्यादी शिंदोडी येथे सासरी असताना पतीने फिर्यादीच्या इच्छेविरूध्द वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच तिला शिवीगाळ करून मारहाण केली. पीडितेच्या सासूनेही तिला उपाशी ठेवून मानसिक व शारीरिक छळ केला. दरम्यान, या जाचाला कंटाळून अखेर पीडितेने पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपबिती सांगितली. एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून घटनास्थळ घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने हा तपास आता घारगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles