इराण-अमेरिकेच्या युद्धादरम्यान भारतात पुरवठा होणाऱ्या पेट्रोलियम पदार्थाच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. युद्धादरम्यान एलपीजी गॅस सेवेविषयी मोठी अपडेट हाती आली आहे. भारतात लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस म्हणजे एलपीजी गॅस पुरवठा सुरळीत होण्यासाठी ४ वर्षे लागू शकतात, अशी शक्यता सरकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे.
भारत सरकारकडून एलपीजीची समस्या सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या युद्धाच्या काळातही एलपीजी गॅस, पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘मनी कंट्रोल’ वेबसाइटला सांगितलं की, सरकारचं लक्ष सध्या एलपीजी आणि कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर आहे. देशातील सर्व घरात एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत सुरू ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे’.
अधिकाऱ्याने पुढे सांगितलं की, ‘एलपीजी पुरवठ्यावर होणाऱ्या परिणाम सरकारचं लक्ष आहे. एलपीजी गॅस पुरवठा सुरळीत होण्यासाठी तीन ते चार वर्ष लागू शकतात. किंवा त्याच्यापेक्षा अधिक वेळ लागू शकतो. एलपीजी गॅस निर्मिती करणाऱ्या ठिकाणावर हल्ले झाले आहेत. त्यामुळे अडचणी येत आहेत’.
‘कच्च्या तेलाच्या विहिरी रिकाम्या झाल्या किंवा उत्पादन थांबलं आहे, यामुळे तेथून पुरवठा बंद झला, हे स्पष्ट झालेले नाही. देशात व्यवस्थितपणे पुरवठा होण्यासाठी कमीत कमी ३ वर्ष लागण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी, २७ फेब्रुवारी रोजीपासून इराण-अमेरिका-इस्त्रायलदरम्यान युद्ध सुरू आहे. भारतात एलपीजी, पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यात अडथळा निर्माण होत आहे. सध्या इराणमध्ये शस्त्रसंधी आहे. परंतु होर्मूझच्या प्रवेशावरून वाद सुरू आहे. यामुळे एलपीजी गॅसच्या पुरवठ्याचं संकट कायम असल्याचे बोलले जात आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारतात ९० एलपीजी गॅस पुरवठा होतो.


