वाढदिवसाच्या दिवशीच रिलस्टार सोनाली जाधवचा शेवट; अनैतिक संबंधातून प्रियकरानेच संपवले

पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील एका रिलस्टार महिलेचा अनैतिक प्रेमसंबंधातून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोनाली नेताजी जाधव (वय ३४) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. सोनालीचा सोळा वर्षांपूर्वी नेताजी जाधव यांच्याशी विवाह झाला होता. विविध प्रकारचे व्हिडिओ तयार करून ती फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असे. अलीकडेच ती या परिसरात रिलस्टार म्हणून प्रसिद्ध झाली होती.

दरम्यान, सोनाली पतीसोबत न राहता आपल्या माहेरी भोसे येथे राहायला आली होती. याच दरम्यान तिचे गावातीलच तुकाराम गावंधरे याच्याशी प्रेमसंबंध जुळून आले. मात्र, काही दिवसांपासून सोनाली दुसऱ्या एका मित्रासोबत फिरत असल्याचे आरोपी तुकारामने पाहिले होते. याच रागातून त्याने सोनालीच्या वाढदिवसाच्या दिवशी, म्हणजेच ६ एप्रिल रोजी ‘गिफ्ट’ देण्याच्या बहाण्याने तिला मोटारसायकलवरून बाहेर नेले.दोन दिवस सोनाली घरी न आल्याने तिच्या वडिलांनी करकंब पोलिस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. दोन दिवसांनंतर रोपळे परिसरातील कालव्यात एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. मयत सोनालीच्या वडिलांनी हा मृतदेह सोनालीचाच असल्याची ओळख पटवली. त्यानंतर करकंब पोलिसांनी संशयित तुकाराम गावंधरे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने सोनालीचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles