जागतिक घडामोडी आणि भूराजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमती पुन्हा एकदा घसरल्या आहेत. १७ एप्रिलच्या सकाळी राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,५२,८९० रुपयांवर पोहोचला आहे. तर मुंबईत हा भाव १,५३,१५० रुपये इतका नोंदवण्यात आला आहे. एकीकडे सोन्यात घसरण होत असताना, चांदीच्या दरात मात्र मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. सोने खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जाणारी अक्षय्य तृतीया अवघ्या २ दिवसांवर आली असल्याने मौल्यवान धातूची चमक वाढू शकते.
सोन्याच्या वाढत्या किमतींदरम्यान मध्य पूर्वेतून एक दिलासादायक बातमी आली आहे. इस्रायल आणि लेबनॉन १० दिवसांच्या युद्धविरामावर सहमत झाले आहेत. भारतीय वेळेनुसार, गुरुवारी रात्री २:३० वाजेपासून हा युद्धविराम लागू झाला आहे. दुसरीकडे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, इराणने अण्वस्त्रे न ठेवण्याचे मान्य केले असून लवकरच एक मोठी ‘डील’ फायनल होऊ शकते. या जागतिक घडामोडींमुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोन्याच्या दरात येत्या काळात चढ-उतार पाहायला मिळू शकतात
प्रमुख शहरांमधील आजचे सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
शहर
२२ कॅरेट सोने (रुपये)
२४ कॅरेट सोने (रुपये)
दिल्ली
१,४०,०७६
१,५२,८१०
मुंबई
१,४०,३८८
१,५३,१५०
पुणे
१,४०,३२३
१,५३,०८०
अहमदाबाद
१,४०,५०७
१,५३,२८०


