अहिल्यानगर-पुणे हायवेवरील लॉजिंगमध्ये युवतीवर जबरदस्तीने संबंध प्रस्थापित केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शेवगाव तालुक्यातील एका गावात राहणार्या पीडित 19 वर्षीय युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात बाप-लेकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय बडे व नवनाथ बडे (दोघे रा. ढाकणेवाडी, ता. पाथर्डी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. विजय बडे याने नगर-पुणे हायवेवरील एका लॉजिंगमध्ये पीडितेशी जबरदस्तीने संबंध ठेवले.
यावेळी संशयित आरोपीने मोबाईलमध्ये पीडितेचे फोटो काढून घेतले. त्यानंतर माझ्याशी संबंध ठेव नाहीतर तुझे फोटो सोशल मीडियावर टाकून तुझी बदनामी करीन, अशी धमकी देत त्याने वारंवार छळ केला. पीडितेने आरोपीचा फोन घेणे बंद केल्याचा राग मनात धरून आरोपीने पीडितेचे फोटो समाजमाध्यमांवर प्रसारित केले. धक्कादायक बाब म्हणजे, पीडिता फिर्याद देण्यासाठी जात असताना संशयित आरोपी विजय बडे आणि त्याचे वडील नवनाथ बडे यांनी बुर्हाणनगर चौकाजवळ तिला व तिच्या वडिलांना अडवून शिवीगाळ व दमदाटी करत हे प्रकरण आपापसात मिटवण्यासाठी दबाव आणला. अ
खेर पीडितेने हिंमत दाखवून पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


