राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर ; राष्ट्रवादीच्या ३५ पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनंतर स्वीकृत नगरसेवक निवडीवरून विविध राजकीय पक्षात नाराजीनाट्य सुरू झालं आहे. स्वीकृत नगरसेवक निवडीवरून सांगलीतील पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामे दिले आहेत. सांगलीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वीकृत नगरसेवक निवडीवरून मोठा वाद उफाळून आलाय. राष्ट्रवादीच्या ३५ पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे दिले आहेत. या पदाधिकाऱ्यांकडून शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्याकडे राजीनामे सुपूर्द करण्यात आले आहेत.

महापालिकेचे गटनेते मैनुद्दिन बागवान यांच्याकडून पक्षाचा आदेश डावलत पक्षाशी संबंधित नसणाऱ्या व्यक्तीची स्वीकृत नगरसेवक पदी निवड करण्यात आल्याचा आरोप करत मैनुद्दीन बागवान यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी देखील शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्याकडून करण्यात आली आहे.

तत्पूर्वी, याप्रकरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे शहर राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असलेला संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles