नगर शहरातील जामखेड रस्त्यावर इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरून पडून तरूणाचा मृत्यू

अहिल्यानगर-शहरातील जामखेड रस्त्यावरील लष्करी शाळेसमोरील फॅमिली क्वॉर्टर्सच्या इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरून खाली पडल्याने गंभीर जखमी झालेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आशिष गणपती गवळी (रा. माधवबाग, आलमगीर रस्ता, भिंगार) असे मृत तरूणाचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 15 एप्रिल रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास आशिष हे इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरून अचानक खाली पडले.

या अपघातात त्यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली होती. घटनेनंतर तातडीने त्यांचे भाऊ नितेश गवळी यांनी त्यांना उपचारासाठी शहरातील खासगी रूग्णालयात दाखल केले. गेल्या चार दिवसांपासून त्याची मृत्यूशी झुंज सुरू होती. मात्र, रविवारी (19 एप्रिल) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी रूग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles