ग्रामसेविकासह दोघांना दहा हजाराची लाच घेताना पकडले
अहिल्यानगर -नगर तालुक्यातील खारे करजूने येथील ग्राम पंचायत कार्यालयातील ग्रामसेविका पुष्पावती सिताराम डेरे व कंत्राटी अधिकारी गौतम सूर्यवंशी सोमवारी दुपारी खारे खर्जुने येथे ग्रामपंचायत कार्यालयातच दहा हजार रुपयांची लाच घेताना नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. तक्रारदाराकडे दहा हजार रुपयाची लाच मागणी करून ती पंचासमक्ष स्वीकारण्यात आली त्यांना रांगेहाथ पकडण्यात आले. गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या घटनेमुळे पंचायत समिती परिसरात उलट सुलट चर्चेला उधाण आले होते.
आलोसे १) पुष्पा डेरे मॅडम, ग्रामसेविका, ग्रामपंचायत कर्जुने खार, ता. नगर (‘वर्ग ३’)
२) गौतम सुर्यवंशी, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, पंचायत समिती अहिल्यानगर (कंत्राटी)
1 प्रत्येकी 5000/- रू प्रमाणे एकुण 10000/- रूपये
10000 /- रूपये
प्रस्तुत बातमीतील हकिकत अशी तक्रारदार यांचे वडील यांनी सन २०२३ मध्ये प्रधानमंत्री आवास
योजनेअंतर्गत घरकुल योजनेसाठी ग्रामपंचायत खारेकर्जुने येथे नाव नोंदवले होते. सन २०२४ मध्ये ऑनलाईन
यादीत नाव आल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया खात्यात १५०००/- रू. अनुदान जमा झाले. त्यानंतर
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा २ मंजुरीसाठी ग्रामसेविका पुष्पा डेरे यांनी १०००० /- रू लाचेची
मागणी केली. तसेच गौतम सूर्यवंशी यांनी घरकुलाच्या तपासणीसाठी आले असता घरकुलाचा निधी मिळवून
देण्यासाठी १०००० /- रू. मागणी केली. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी ला.प्र.वि.
कार्यालयात तक्रार दिली. तक्रारीचे अनुषंगाने लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान ग्रामपंचायत कार्यालय, कर्जुने
खारे, वा. नगर येथे तक्रारदार यांचेकडे आलोसे यांनी प्रधानमंत्री आवास योजना टप्पा-२ मंजुरीसाठी लाचेची
मागणी केल्याचे निष्पन्न झाले. आलोसे यांनी प्रत्येकी ५०००/- रुपयांच्या लाचेची मागणी केलेली असल्याचे
निष्पन्न झाले.
सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार हे आलोसे क्रमांक १पुष्पा डेरे यांचेकडे लाच रक्कम देण्यासाठी
| गेले असता त्यांनी आलोसे सूर्यवंशी यांच्याकडे रक्कम देण्यास सांगितली. निमगाव घाना रोड, कर्जुने खारे, ता.
नगर येथे आलोसे सूर्यवंशी यांनी तक्रारदार यांचे कडुन १०,०००/- रुपये लाच रक्कम स्वीकारले असता
त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे
नगर तालुक्यात महिला ग्रामसेविकासह एक जण दहा हजाराची लाच घेताना पकडले
- Advertisement -


