राहुरी विधानसभा पोटनिवडणुक माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंनी माघार घेतली; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले…..

राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या अक्षय कर्डिले यांच्यासमोर कडवे आव्हान निर्माण करण्याची क्षमता असलेले शरद पवार गटाचे नेते आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे सध्या भाजपच्या मार्गावर असल्याची जोरदार चर्चा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोमवारी राहुरीतपार पडलेल्या सभेवेळी ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी जोरदार हवा होती. मात्र, तसे काही घडलेले नाही. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या सभेत जाहीरपणे प्राजक्त तनपुरे यांचे जाहीर आभार मानत अनेक नव्या शक्यतांना आणि राजकीय समीकरणांना वाट मोकळी करुन दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात म्हटले की, मी प्राजक्त तनपुरे यांना एक कॉल केला. मी त्यांना म्हटले की, प्राजक्तजी माझी तुम्हाला विनंती आहे. शिवाजीराव कर्डिले यांच्यासारखा जुनाजाणता नेता आपल्यातून गेलाय, ही पोटनिवडणूक आहे. तुम्ही या निवडणुकीतून माघार घेतली तर महाराष्ट्राची संस्कृती आहे, त्याला धरुन निर्णय घ्यावा. एका मिनिटांत प्राजक्त तनपुरेंनी माझं म्हणणं मान्य केलं, ते निवडणुकीला उभे राहिले नाहीत, माघार घेतली. यासाठी मी त्यांचे जाहीरपणे आभार मानतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

प्राजक्त तनपुरे सोमवारी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा होती. त्यादृष्टीने सोमवारी दिवसभर आणि गेल्या काही दिवसांपासून प्राजक्त तनपुरे हे आपल्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी सातत्याने चर्चा करत होते. मात्र, भाजपमध्ये जायचे की नाही, याबाबतचा त्यांना निर्णय अद्याप झालेला नाही.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles