भाजपाच्या मोर्चामुळे मुंबईत वाहतूक कोंडी; महिलेने मंत्री गिरीश महाजन यांना सुनावले खडेबोल

लोकसभेत महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीने मुंबईतील वरळी डोम येथे ‘जन आक्रोश महिला संमेलन’ आयोजित केले होते. मात्र, या आंदोलनामुळे झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीचा फटका बसलेल्या एका महिलेने थेट मंत्री गिरीश महाजन यांनाच खडेबोल सुनावले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
भाजपाच्या या मोर्चामुळे वरळी आणि परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. तासनतास वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे एका महिलेचा संयम सुटला. तिने थेट मोर्चाच्या ठिकाणी जाऊन गोंधळ घातला आणि समोर असलेल्या मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारला. “विरोध करायचा असेल तर मैदानात करा, लोकांना ट्रॅफिकमध्ये का अडकवता?” असा सवाल करत तिने आपला संताप व्यक्त केला. यावेळी पोलीस आणि महिला आंदोलकांमध्येही शाब्दिक चकमक उडाली.
या घटनेवरून आमदार रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. “केवळ ‘हिज मास्टर्स व्हॉईस’ला खूष करण्यासाठी लोकांना तीन-तीन तास वेठीस धरणे चुकीचे आहे. आंदोलनाचे कारण खोटे असेल तर लोक अशीच फजिती करतात,” असे ट्विट पवारांनी केले आहे. तसेच, संबंधित महिलेवर कारवाई न करता सत्ताधाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
https://x.com/INCHarshsapkal?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E2046576183740109116%7Ctwgr%5E5d11610da19e78b46d2d152a07802d928a9acca6%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9marathi.com%2Fmaharashtra%2Fharshvardhan-sapkal-criticizes-bjp-again-on-womens-reservation-and-delimitation-bill-1652567.html

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles