अहिल्यानगर ः शहर परिसरातील नेप्ती नाका येथे जुन्या वादातून एका तरुणावर धारदार शस्त्र आणि हॉकीस्टिकने भीषण हल्ला केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला असून, हल्लेखोरांनी त्याच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची साखळी देखील चोरून नेली आहे.पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.महेश अशोक चव्हाण हे रात्री दीड वाजेच्या सुमारास मित्रासोबत दुचाकीवरून जात असताना ही घटना घडली.शेळके हॉटेलसमोरील पिंपळाच्या झाडाखाली दबा धरून बसलेल्या स्वप्नील उर्फ सोन्या राजेंद्र दातरंगे याने त्यांना अडवले. ’मी नालेगावचा दादा आहे’ असे म्हणत त्याने शिवीगाळ सुरू केली. त्याचवेळी तेथे आलेल्या राजेंद्र उर्फ राज्या पांडुरंग कोंडके याने चव्हाण यांच्या हातावर चाकूने वार केला.स्वप्नीलने चव्हाण यांना घट्ट पकडून ठेवले, तर राजेंद्रने हॉकीस्टिकच्या भरीव दांडयाने त्यांच्या हातापायावर दहा मिनिटे सलग प्रहार केले. मारहाणीत चव्हाण जमिनीवर कोसळल्यानंतर आरोपींनी त्यांच्यावर दगडानेही हल्ला केला. तुला आज जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत आरोपींनी ्रपरिसरात दहशत निर्माण केली.
नगर शहरातील नेप्ती नाका येथे तरुणावर जीवघेणा हल्ला
0
448
Related Articles
- Advertisement -


