देसवडेच्या चेडोबा पठाराला सुजित झावरे पाटील यांचा आधार
पारनेर :- पारनेर तालुक्यातील शेवटचे गाव असणारे देसवडे गावातील चेडोबा पठाराला सुजित झावरे पाटील यांचा आधार मिळाला असून हजारो हेक्टर शेतीसाठी अत्यावश्यक असणाऱ्या महत्वाच्या रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ शिवसेना नेते व जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते पार पडला. सुमारे एक किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी 18 लक्ष रुपये निधी मंजूर झाला असून पुढील कामासाठी लागणारा निधीही तात्काळ मंजूर केला जाईल, तसेच देसवडे गावातील सामाजिक सभागृहासाठीही आवश्यक लागणारा निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन सुजित झावरे पाटील यांनी दिले.
हजारो हेक्टर शेती असणाऱ्या चेडोबा पठारावर शेतकऱ्यांना शेतमालाची वाहतूक करण्यासाठी आवश्यक असणारा हा रस्ता अतिशय महत्वाचा होता व या भागातील शेतकऱ्यांनी सुजित झावरे पाटील यांना या रस्त्याची मागणी केली होती. या रस्त्याच्या कामामुळे या भागातील शेतकऱ्यांचा प्रश्न मिटला असून सदर शेतकऱ्यांनी सुजित झावरे पाटील यांचे आभार मानले.
राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून तालुक्यातील अडचणीच्या रस्त्यासाठी आपण सातत्याने निधी उपलब्ध करून देत आलो असून कोणत्याही गावात नागरिकांच्या पायाभूत सोयीसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण कमी पडणार नसल्याचेही सुजित झावरे पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच तालुक्यातील कोणत्याही गावात नागरिकांनी मागितलेल्या कामांना निधी कमी पडून देणार नसल्याचे प्रतिपादन सुजित झावरे पाटील यांनी केले आहे.
यावेळी शिवसेना प्रवक्ते संजीव भोर, शिक्षक नेते अमोल साळवे, शिवसेना ढवळपुरी जिल्हा परिषद गटप्रमुख स्वप्नील राहीन्ज, किसन धुमाळ, जेष्ठ नेते निजाम पटेल, शिवसेना उपतालुकाप्रमुख संतोष गाढवे, पोखरी सरपंच सतीश पवार, वारणवाडी सरपंच संजय काशीद, देसवडे सरपंच पोपट दरेकर, चेअरमन संतोष टेकूडे, माजी चेअरमन भाऊसाहेब टेकूडे, माजी चेअरमन संजय भोर, भूमिपुत्र संघटनेचे प्रवक्ते संजय भोर, सोपान वाडेकर, पांडुरंग दरेकर, अविनाश भोर, वैभव गुंड, भाऊसाहेब दरेकर, नवनाथ जाधव, एकनाथ फटांगडे, बाळासाहेब वाडेकर, संजय कोकाटे, संतोष काकडे, रावसाहेब फटांगडे, उल्हास दरेकर, शिवाजी फटांगडे, संकेत भोर, शुभम टेकूडे, संपत दरेकर, सुभाष गोळे, अविनाश भोर व ग्रामस्थ उपस्थित होते.


