onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव

onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव

अहिल्यानगर बाजार समिती आजचे बाजार भाव

दिनांक -27-04–2026 एकुण कांदा गोणी -21,798
लाल कांदा बाजार भाव

1 नंबर= 900 ते 1100
2 नंबर= 600 ते 900
3 नंबर= 300 ते 600

4 नंबर= 150 ते 300
————————————————————————-


दुकान रिकामे करण्यासाठी भाडेकरूंना धमकावले; तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल
​अहिल्यानगर : शहरातील सावेडी नाका परिसरातील इंडियन बँकेजवळ असलेल्या भाड्याच्या दुकानाच्या वादातून एका व्यक्तीसह त्याच्या भाडेकरूंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात एका ओळखीच्या व्यक्तीसह इतर तीन अनोळखी इसमांविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.​याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी सय्यद इरफान अजिमोद्दीन जहागीरदार (वय ५२, रा. बाराइमाम कोठला) हे घरी असताना त्यांना मोबाईल फोनवर संपर्क करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तसेच आरोपी आकाश सोनवणे याने इतर तीन साथीदारांसह फिर्यादीच्या सावेडी नाका येथील मालकीच्या दुकानात जाऊन तेथील भाडेकरूंना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. ‘हे दुकान तातडीने रिकामे करा, अन्यथा जीवे मारू’ अशी धमकी आरोपींनी भाडेकरूंना दिली. या अनपेक्षित प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

​फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून तोफखाना पोलिसांनी आरोपी आकाश सोनवणे व त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३५२ आणि ३५१ (२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक पुनम श्रीवास्तव करत आहेत. अहिल्यानगर पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारे धमकावणाऱ्या प्रवृत्तींपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles