नगरच्या वन विभागाच्या कार्यालयातील चंदनाचे झाडाची चोरी करणारे 02 स्थानिक गुन्हे शाखेकडुन ताब्यात

वन कर्मचाऱ्याला बांधुन, वन विभागाच्या जिल्हा कार्यालयातील चंदनाचे झाडाची चोरी करणारे 02 आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडुन ताब्यात.

प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, दिनांक 18/04/2026 रोजी रात्री 02.15 वा. चे सुमारास वन विभागीय कार्यालय अहिल्यानगर या ठिकाणी रात्रपाळीस तैनात असलेले वनमजुर रमेश पोपट शेळके वय 58 वर्षे, रा. गुंडेगांव, ता. जि. अहिल्यानगर यांना अनोळखी 4 आरोपींनी अशोकाच्या झाडास बांधुन सहाय्यक वन संरक्षक यांचे निवासस्थानाजवळील 20,000/- रुपये किमतीची 02 चंदनाची झाडे तोडुन चोरुन नेलेली आहे. सदर घटनेबाबत वर नमुद वन मजुर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अहिल्यानगर कॅम्प पोलीस ठाणे गु.र.नं. 205/2026 भारतीय न्याय संहिता कलम 309 (4), 3 (5) प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मा. श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांनी वर नमुद गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेस आदेशित केलेले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. किरणकुमार कबाडी यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/हरिष भोये, पोउपनि/राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार सुनिल पवार, फुरकान शेख, शाहिद शेख, गणेश धोत्रे, बाळासाहेब नागरगोजे, अमृत आढाव, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब खेडकर, प्रशांत राठोड, किशोर शिरसाठ, योगेश कर्डीले, भगवान धुळे, अरुण मोरे यांचे महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत यांचे पथक तयार करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत पथकास सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना करण्यात आले.
वरील पथकाने गुन्हा ठिकाणी भेट देवुन आरोपीचे येण्या जाण्याचे मार्गाची पाहणी केली, तसेच यापुर्वी शासकिय कार्यालयामधील चंदन चोरी करणारे आरोपींची माहिती संकलित करुन व व्यवसायीक कौशल्याचे आधारे सदर गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करण्यात आले. त्यामध्ये रेकॉर्ड वरील आरोपी मसीद गोलवाल रा. छत्रपती संभाजीनगर याने व त्याचे इतर साथीदार असल्याचे निष्पन्न झाले. सदर माहितीचे आधारे छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील अजिंठा, सिल्लोड, बदनापुर, आडगांव माऊली, खामगांव, पळसे या परिसरामध्ये सलग 05 दिवस शोध घेवुन आरोपी नामे 1) मसीद नसीब गोलवाल वय 24 वर्षे, रा. जंजाळा, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर, 2) शाहीदखा अलीखा कलेसे वय 26 वर्षे, रा. सदर यांना अतिसंवेदनशील भागातुन ताब्यात घेण्यात आले. मिळुन आलेल्या आरोपींकडे सखोल व बारकाईने विचारपुस करता त्यांनी सदरचा गुन्हा त्यांचे साथीदार 3) असलमखा भुरेखा पठाण रा. माहुली, आडगांव, सरक, ता. जि. छत्रपती संभाजीनगर(फरार), 4) नसीबखा मुनीरखा जोनवाल रा. सदर (फरार) अशांनी मिळुन केला असल्याची कबुली दिली आहे. फरार आरोपींचा शोध घेता ते मिळुन आलेले नाही. सदर गुन्ह्यातील आरोपी यांनी मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथुन सुध्दा चंदनाचे झाडाची चोरी केलेली असल्याचे व ते सदर गुन्ह्यामध्ये फरार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
ताब्यातील आरोपींचे कब्जातुन गुन्ह्याचे वेळी वापरलेली 20,000/- रुपये किमतीची एक सी.बी.झेड मोटारसायकल नंबर एम.एच. 28 डब्लु 9738 ही जप्त करण्यात आलेली आहे. आरोपींना गुन्ह्याचे पुढील तपासकामी अहिल्यानगर कॅम्प पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास अहिल्यानगर कॅम्प पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles