शिवसेनेकडून विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी 2 उमेदवार जाहीर; एकनाथ शिंदे म्हणाले,

अखेर शिवसेना शिंदे गटाचे विधान परिषद निवडणुकीसाठीचे दोन्ही उमेदवार ठरले असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेचे दोन्ही उमेदवार ठरले असून काही वेळेत दोन्ही उमेदवार उमेदवार अर्ज भरणार असल्याची माहिती आहे. बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हे यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली असल्याची माहिती समोर आली आहे. थोड्याच वेळात मुख्यनेते एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत दोन्ही नेते विधान भवनात अर्ज भरण्यासाठी येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

तर गेल्या २४ तासात झालेली चर्चा आणि समोर ठेवलेल्या मागण्या पूर्ण करण्याचे मान्य केल्यानंतर आज बच्चू कडू शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहेत, पक्षप्रवेशानंतर आज शिवसेनेकडून त्यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी जाहीर झाली आहे. तर सुरूवातीपासूनच नीलम गोऱ्हे यांच्या नावाची चर्चा सुरू होती. आज या दोन्ही नेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून ते आता आपला उमेदवारी अर्ज भरत आहे.

बच्चू कडू यांच्या पक्षप्रवेशानंतर माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदेंनी दोन्ही नावे जाहीर केली आहे, त्यांनी बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हे यांची नावे जाहीर केली, त्याचबरोबर माझं सगळ्यांवर लक्ष असतं, सगळ्यांना संधी मिळेल, माझं सगळ्यांवर लक्ष असलतं असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. ⁠पद कमी असतात, इच्छा अनेक व्यक्त करतात. माझं प्रत्येकावर लक्ष असतं. जो काम करेल तो पुढे जाईल. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, मालकांचा नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच गोरगरीबांचा आंदोलक नेता म्हणून बच्चू कडू यांची ओळख आहे. बच्चू कडू यांनी मुंबईतील सर्व पदाधिकाऱ्यांसोबत पक्षप्रवेश केला. दिव्यांगांसाठी लढणारा झटणारा नेता म्हणून बच्चूभाऊंची ओळख आहे. शिवसेनेत तुमचं स्वागत करतो, शिवसेना तुम्हाला नवीन नाही, तुम्ही मुळचे शिवसैनिकचं आहात, असं एकनाथ शिंदे बच्चू कडू यांना शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यानंतर म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles