बेपत्ता तरुणाची निर्घृण हत्या मृतदेह लपवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न फसला..भिंगार कॅम्प पोलिसांकडून दोघाना बेड्या

एका बेपत्ता तरुणाची निर्घृण हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह उसाच्या शेतात लपवून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या प्रकरणाचा अत्यंत शिताफीने तपास करत भिंगार कॅम्प पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून,गुन्ह्याचा छडा लावला आहे.दि.२७ एप्रिल २०२६ रोजी वाकोडी गावच्या पोलीस पाटलांनी पोलिसांना माहिती दिली की,वाकोडी शिवारातील दत्तात्रय गवळी यांच्या उसाच्या शेतात एक बेवारस बॅग सापडली आहे.या बॅगेत प्रसाद रोहिदास जाधव याचे आधारकार्ड आणि काही रक्ताचे डाग मिळून आले. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली असता,प्रसाद हा परीक्षेसाठी जातो असे सांगून घरातून बाहेर पडला होता आणि तो बेपत्ता असल्याची माहिती समोर आली.भिंगार कॅम्प पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली.फुटेजमध्ये प्रसाद जाधव याला काही संशयित इसम मोटारसायकलवर बसवून नेताना दिसले.या माहितीच्या आधारे पोलिसांनी २९ एप्रिल रोजी पहाटे ४:०० वाजता वाकोडी परिसरात ‘कोंबिंग ऑपरेशन’ राबवले.तपासा दरम्यान पोलिसांनी शुभम हरी भोसले आणि समाधान उर्फ बाळ्या रामदास सोनवणे या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली.पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला.त्यांनी सांगितले की,२६ एप्रिल रोजी रात्री ८:३० च्या सुमारास त्यांनी प्रसाद जाधव याला लाकडी दांडक्याने आणि दगडाने डोक्यात मारहाण करून त्याची हत्या केली

सदरची धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्पचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर,पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, सालगुंडे,अकोलकर, सहायक फौजदार सतीश भांड,रेवननाथ दहिफळे,दीपक शिंदे,रवी टकले, नंदकुमार पठारे,धर्मनाथ पालवे, रेवननाथ मिसाळ,रेखा पुंड, महादेव पवार,किरण बर्वे, प्रियंका भिंगारदिवे,बंडू भागवत, सुपेकर,व्यवहारे,बाळकृष्ण दौंड, विशाल दळवी,विनोद बोरगे, सुरज कदम,रमेश शिंदे,स्वाती तोडमल,वर्षा पंडित,रोहिणी दरंदले,योगिता साळवे,पल्लवी रोहकले यांनी केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles