देशात उडाला महागाईचा भडका; LPG सिलिंडरच्या दरात मोठी वाढ

व्यावसायिका सिलिंडरनंतर ५ किलोचा सिलिंडरच्या दरात वात

५ किलोच्या गॅस सिलिंडरच्या दरात २६१ रुपयांनी वाढ

गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांना झटका

व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात ९९३ रुपयांनी वाढल्यानंतर आता ५ किलोच्या सिलिंडरच्या दरातही वाढ झाली आहे. ५ किलोच्या फ्री ट्रेड एलपीजी सिलिंडरच्या दरात २६१ रुपयांनी महागला आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या दरवाढीचा फटका रेस्टॉरंट, हॉटेल, बेकरी आणि छोट्या व्यावसायिकांना बसणार आहे. परंतु एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल न झाल्याने ३३ कोटी कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.नव्या दरानुसार, दिल्लीत १९ किलो ग्रॅमचा व्यावसायिक सिलिंडर ९९३ रुपयांनी महागला आहे. या गॅस सिलिंडरचा दर ३,०७१.५० रुपये इतका झाला आहे. ५ किलो फटीएल सिलिंडर २६१ रुपयांनी वाढून १७५४.५ रुपये इतका झाला आहे. सरकारने सर्वसामान्यांना महागाईचा दिलासा मिळावा, यासाठी घरगुती सिलिंडरसाठी सबसिडी सुरुच ठेवली आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवर अवलंबून असतात.

पश्चिम आशियात इराण-अमेरिकेत सुरू असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढल्या आहेत. कच्चा तेलाचा बॅरल १२६ प्रति बॅरल इतक्या किंमतीवर पोहोचला आहे. या बॅरलचा भाव शुक्रवारी ११२ डॉलर इतक्या किंमतीवर पोहोचला. भारत एलपीजी मोठ्या प्रमाणात आयात करतो. त्यामुळे व्यावसायिक सिलिंडरच्या दरात चढ उतार पाहायला मिळत आहे.

१९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याने हॉटेलमधील खाद्यपदार्थाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिक दरवाढीचा अतिरिक्त भार ग्राहकांवर ढकलण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत हॉटेल, रेस्टॉरंटमधील पदार्थाच्या किंमती वाढलेल्या पाहायला मिळू शकतात. छोटी दुकाने, घरात वापरण्यात येणारा ५ किलोचा एफटीएल सिलिंडरवर कोणतीही सबसिडी देण्यात आलेली नाही.

सरकारने या महिन्यात घरगुती सिलिंडरच्या दरात वाढ केलेली नाही. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. या महिन्यात १६ टक्के पेट्रोलियम उत्पादकात वाढ झाली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles