इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा शाही विवाहसोहळा ; मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गज मंडळींची हजेरी

संगमनेरमध्ये महाराष्ट्राचे प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा शाही विवाहसोहळा पार पडत आहे. निवृत्ती महाराज देशमुख यांची कन्या ज्ञानेश्वरी देशमुख यांचा विवाह साहिल चिलप यांच्याशी होत आहे. ज्ञानेश्वरी देशमुख यांचा साखरपुडा देखील चांगलाच चर्चेमध्ये आला होता. इंदोरीकर महाराज यांनी मोठ्या थाटात आपल्या मुलीचा साखरपुडा केला होता. साखर पुड्यात केलेल्या खर्चावरून इंदोरीकर महाराज यांच्यावर चांगलीच टिका झाली होती, दरम्यान त्यानंतर आज आता इंदोरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी देशमुख यांचा विवाहसोहळा पार पडत आहे. या विवाह सोहळ्यावर देखील प्रचंड खर्च करण्यात आला आहे. तब्बल 100 एकर जागेवर हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

दरम्यान या विवाहसोहळ्यासाठी राजकीय, सामाजिक तसेच अध्यात्मिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली आहे. इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ बागडे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री छगन भुजबळ, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, खासदार राजन विचारे, खासदार राजाभाऊ वाझे , खा.भाऊसाहेब वाकचौरे , आ.श्वेता महाले , आ.अमोल खताळ , आ.विठ्ठलराव लंघे , आमदार किरण लहामटे, आ.सत्यजित तांबे , विधानपरिषदेचे आ.विवेक कोल्हे , आ.शरद सोनवणे , जिल्हा परिषद माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील, बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात या सर्व नेत्यांनी हजेरी लावली आहे.

विवाहस्थळी भव्य रुखवताची मांडणी करण्यात आली आहे. रुखवतातील पारंपारिक देखाव्यांनी सर्वांच लक्ष वेधल आहे. ग्रामीण संस्कृतीची जिवंत झलक या रुखवताच्या माध्यमातून दाखवण्यात आली आहे. हे रुखवत लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांसाठी खास आकर्षण ठरलं आहे. विवाह जमवण्यापासून ते लग्नाच्या सर्व विधींची सुंदर सांगड, या रुखवतामध्ये पहायला मिळत आहे. साखरपुडा, हळद, वऱ्हाडींचे स्वागत ते मुख्य विवाह सोहळा अशा प्रत्येक टप्प्यांचं सादरीकरण या रुखवतामध्ये करण्यात आलं आहे. पारंपारिक वस्तू, शेतीशी निगडीत देखावे, जुन्या संस्कृतीचं दर्शन, विविध गोडधोड पदार्थांची आकर्षक मांडणी या रुखवतामध्ये करण्यात आली आहे. महाराष्ट्रीयन परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम, या रुखवतामध्ये पहायला मिळत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles