राज्याचे माजी मुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी एका विमान अपघातात आकस्मिक निधन झाल्याने बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली होती. या पोटनिवडणुकीसाठी महायुतीने अजित पवारांच्या पत्नी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीची आज मतमोजणी पार पडत असून तिसऱ्या फेरीअखेर सुनेत्रा पवार यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. यादरम्यान सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट केली आहे.
सुनेत्रा पवार यांनी पोटनिवडणुकीत मतदारांनी दाखवलेला विश्वास आपण अजितदादांच्या स्मृतीस अर्पण करत असल्याचे म्हणाल्या आहेत. त्या म्हणाल्या, “आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना आपण सर्वांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास मी आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करते”
इतकेच नाही तर सुनेत्रा पवार यांनी पोटनिवडणूक विजयाचा जल्लोष साजरा करताना काय काळजी घ्यावी याबद्दल कार्यकरत्यांना आवाहन देखील केले आहे. “आजचा हा निकाल जाहीर होत असताना आदरणीय दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने आपण सर्वजण भावूक आहोत. दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की, या विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये. आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया.”
बारामती पोटनिवडणूक निकालात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. तिसऱ्या फेरीअखेर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना २६७७३ मते मिळाली आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या २२ उमेदवारांना अवघी एकूण ३८९ इतकी मते मिळाली आहेत. तर ‘नोटा’ला ८८ मते पडली आहेत.
बारामती विधानसभा पोटनिवडणुक निकालात सुनेत्रा पवारांची निर्णायक आघाडी; मनाला भिडणारी पोस्ट, म्हणाल्या
- Advertisement -


